कर्जत, (प्रतिनिधी) – कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने साहित्यिक, वैद्यकीय, शैक्षणिक व राजकीय अशा विविध क्षेत्रातील महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
साहित्यिक क्षेत्रातील प्रसिद्ध कवयित्री स्वाती पाटील, वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉ.जयश्री मुळे, राजकीय क्षेत्रातील चांदे बुद्रुक गावच्या आदर्श सरपंच पूजा सूर्यवंशी आणि कर्जत पंचायत समितीच्या गटशिक्षणाधकारी उज्वला गायकवाड तसेच विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांचा गुलाबपुष्प व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
“महिलांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळत आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी”,असा सल्ला प्रमुख अतिथी डॉ.जयश्री मुळे यांनी दिला.सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतामधून “आपण स्री जन्माचे स्वागत केले पाहिजे.आपली आई, बहिण तसेच समाजातील इतर मुलींनाही आपण सन्मानाची वागणूक दिली पाहिजे”,असे प्रतिपादन केले.
महिलांना सन्मानाची वागणूक देणे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे, असे मत प्राचार्य राजकुमार चौरे यांनी यावेळी व्यक्त केले याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक भालचंद्र देशमुख, किशोर कर्पे, सेवकवृंद उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य राजकुमार चौरे यांनी केले. आभार उपप्राचार्य लालासाहेब शिंदे यांनी मानले.सूत्रसंचालन परशुराम गांगर्डे, अनिल सोनवणे यांनी केले.