कामशेत – नाणे मावळ आणि कामशेत परिसरात बुधवारी (दि. 25) दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडविली. मंगळवारी वातावरणात उकाडा वाढला होता व बुधवारी पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास मावळात ठिकठिकाणी तुरळक सरी कोसळल्या होत्या.
त्यानंतर दुपारी साडेतीन वाजल्याच्या सुमारास अचानक गारांसह जोरदार पाऊस सुरू झाला आणि पाचच्या सुमारास थांबला. अचानकपणे आलेल्या या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या झेंडूची फुले, टोमॅटो, काकडी, मिरची या पिकांना झोडून काढल्याने यापिकांचे नुकसान झाले आहे.