ब्रिटनच्या राजघराण्यावर कोरोनाचा हल्ला; प्रिन्स चार्ल्स पॉसिटीव्ह

लंडन: ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचा चाचणी अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. परंतु त्यांची प्रकृती ठीक असल्याचे क्लेरेन्स हाऊसने बुधवारी जाहीर केले. स्कॉटलंडमध्ये 71 वर्षीय प्रिन्स चार्ल्सची कोरोना विषाणूची तपासणी झाली.

येथे ते आपली पत्नी कमिला, डचेस ऑफ कॉर्नवॉल बरोबर होते, त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. क्लेरेन्स हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले की सरकारी व वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रिन्स आणि डचेस यांनी आता स्कॉटलंडमधील घरी स्वतःला एकटे केले आहे.

काही दिवसांपूर्वी चार्ल्स यांना मोनाकोचा प्रिन्स एल्बर्ट भेटले होते. त्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 400 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर 8,000 हून अधिक लोक असुरक्षित आहेत.

क्लेरेन्स हाऊसच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार चार्ल्समध्ये या आजाराची काही लक्षणे आहेत, परंतु त्याशिवाय त्यांनी तब्येत ठीक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते घरून काम करत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.