बारामती – तालुक्यातील मेडद गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून गावात अंतर्गत रस्ते, भूमिगत गटारे, R.O. फिल्पत्राशेड, अंगणवाडी इमारत अशा अनेक विकासकामांचा पंचायत समितीच्या सभापती अनिता बारवकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
मेडद हे बारामातीच्या प्रवेशद्वारावर असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गावच्या विकासावर खूप बारकाईने लक्ष ठेवले आहे. त्यांच्या कल्पनेतूनच बारामती-मेडद या चौपदरी रस्त्याचे व सुशोभिकरणाचे काम अत्यंत कमी वेळात व दर्जेदार पद्धतीने प्रगतीपथावर आहे. त्यामुळे मेडद या गावाला महत्व प्राप्त झाले आहे.
तसेच मेडद हे गाव नगरपालिकेत समाविष्ट होणार आहे. गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. बारामतीचे प्रवेशद्वार असलेले मेडद-बारामती रोड हा भिगवण रस्त्याप्रमाणेच चारपदरी व सुशोभित होणार असल्याने या गावाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
कार्यक्रमास यावेळी ग्रा.पं.सदस्या सुमन गावडे, माधुरी कांबळे, बबन गावडे,संतोष बागाव, रमेश गावडे, शंकर गावडे, अजित कांबळे, सीताराम कांबळे, मानसिंग जाधव, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक महेश ढवान, स.पोलीस कर्मचारी राजेंद्र काळे, हृदयनाथ देवकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनातून मेडद गावात विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. अंतर्गत रस्ते, भूमिगत गटारे, R.O. फिल्पत्राशेड, अंगणवाडी इमारत अशा अनेक विकासकामांचा शुभारंभ आज करण्यात आला. गावच्या विकासात भर घालणारी विविध कामे देखील प्रस्तावित आहेत.
– डॉ. उज्वला गावडे, सरपंच ग्रामपंचायत मेडद