नवी दिल्ली : करोनामुळे अनेक महिन्यांपासून जगभरातील अनेक देशांच्या लहान मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मूभा दिली आहे. खास करुन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ही मूभा दिली आहे. त्यामुळे घरात बसूनच आठ तासांची शिफ्ट कर्मचारी करत आहे. मात्र असे असले तरी कोरनापूर्व काळामध्ये वर्क फ्रॉम होमची स्वप्न पाहणाऱ्यांना आता घरुन काम करण्याचा कंटाळा आला.
अनेकांनी वर्क फ्रॉम होम सुरुवातील छान वाटत होतं मात्र आता नकोसं झालं असल्याचं म्हटलं आहे. वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करण्याचा कंटाळा आला असला तरी त्यासंदर्भातील अनेक मिम्स मात्र नेटकऱ्यांना आनंद देत आहे. असाच एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे लग्नाच्या पहिल्या रात्री नववधू पलंगावर सजून बसते त्याप्रमाणे बसलेली दिसत आहे. मात्र तिचा नवरा बेडसमोरच त्याच्या कंप्युटर डेस्कवर काम करताना दिसत आहे. या नवऱ्या मुलाने आपला नवरदेवाचा पेहराव तसाच ठेऊन कंप्युटर ऑन करुन त्यावर काम करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, त्याच्या या काम करण्यामागे काय कारण असावे यासंदर्भातील चर्चा आणि शक्यता व्यक्त केल्या जात आहे. काहींनी मधुचंद्राच्या रात्रीच या व्यक्तीला वर्क फ्रॉम होमचा कॉल आल्याची शक्यता व्यक्त केलीय तर काहींनी हा व्यक्ती कोणता जॉब करत असेल याबद्दलचा अंदाज बांधला आहे. नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये धम्माल कमेंट्स केल्याने हा फोटोत चर्चेत आला आहे.
“hold on babe let me check my twitter notifications first” pic.twitter.com/Fz9qjDrKj9
— paneer (@albertkamuh) February 9, 2021
Office work urgent balancing work Life and personal life
— Novaraju (@Novaraju2) February 10, 2021
ये सब तो ठीक है पर ये तीसरा कौन है कमरे में जो फिरकी ले रहा है😂😂
— Vikas kumar Tyagi (@UpasakVK) February 11, 2021
He want play pubg
— Ajkiller kar (@AjkillerK) February 11, 2021