पुणे – डेक्कन नदीपात्रात मगर दिसल्याची खबर मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. मोठ्या संख्येने पोलीस व जवान दाखल झाल्याने बघ्यांची गर्दी ऊसळली होती.
दरम्यान हौसे नवसे व्यक्ती मोबाईलवर छायाछित्रण करत असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात उसळली होती. दरम्यान घटनास्थळी वनविभागाचे अधिकारीही दाखल झाले होते. यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे म्हणाले, मगर असल्याची खबर मिळाल्याने घटनास्थळी स्टाफसह दाखल झालो. मात्र आतापर्यंत नागरिकांनी दाखवलेल्या ठिकाणी फक्त गाळ आणी कचराच हाती लागला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.