नवी दिल्ली – प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एअर इंडियाच्या पायलट आणि क्रू मेंबर्सला अंमलीपदार्थ सेवन तपासणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही तपासणी अचानक घेण्यात येईल, अशी माहिती मिळते आहे.
कामावर असताना पायलट आणि क्रू मेंबर्सनी अंमलीपदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे. त्यासाठी ब्रिदिंग टेस्ट विमान कंपन्यांकडून घेतली जाते. मात्र, ही तपासणी पुरेशी नाही. त्यामुळे एअर इंडिया नवीन पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ड्रग्ज टेस्ट सुरू केल्यास एअर इंडिया ही अशी तपासणी करणारी पहिली विमानसेवा ठरेल. या तपासणीत कुणी दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला कामावर जाण्यास प्रतिबंध घातला जाईल.