महापौर उषा ढोरे झाल्या अवघ्या शहराच्याच “माई’!

कालावधी : 22 नोव्हेंबर 2019 पासून ते आतापर्यंत

तान्हुल्याच्या पाळण्याची दोरी हाताळण्याची सवय असणाऱ्या महिलेच्या हातात जेव्हा शहराच्या सत्तेची दोरी येते. ती कधी अनाथांची माय होते, तर कधी दुष्ट प्रवृत्तींसाठी कर्दनकाळ ! घर आणि नोकरी सांभाळण्याची कसरत लीलया पार पाडणाऱ्या महिलावर्गाची सगळी बलस्थाने सोबत घेऊन, कधी कोविडयोध्या तर कधी बेवारसांची आई बनून अवघ्या पिंपरी-चिंचवड शहराची ‘माई’ बनून आपले नाव सार्थक करणाऱ्या विद्यमान महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी 22 नोव्हेंबर 2019 रोजी उषा उर्फ माई ढोरे यांची निवड झाली. शहरातील दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मेट्रोसाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला. तसेच मेट्रोला ‘पिंपरी चिंचवड-पुणे मेट्रो’ असे नाव द्यावे यासाठी त्यांचा आग्रह आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार शहरात प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. चिखली जलशुद्धीकरण ते देहूगाव बंधारा या दरम्यान 10 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

सांगवी बोपोडी दरम्यान 17 मीटर डीपी रस्ता जोडण्यासाठी मुळा नदीवर नवीन पूल बांधण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. केंद्र शासनाने सुरू केलेल्या सायकल्स फॉर चेंज या उपक्रमासाठी देशभरातील स्मार्ट शहरामंध्ये सुरक्षित सायकल ट्रॅक तयार करण्याच्या उपक्रमात पिंपरी चिंचवड शहराचा सहभाग आहे. यासाठी माईंची दूूरदृष्टी कामी आली आहे.

माई महापौर झाल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये शहरामध्ये करोनाचे संकट आले. केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे कंपन्या बंद झाल्याने कामगार रस्त्यावर आले. शहरामध्ये 12 मार्च रोजी करोनाचे पहिले रुग्ण आढळले.

पहिल्या दिवसांपासून करोनाला रोखण्यासाठी महापौर माई ढोरे यांनी उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली. त्यांनी सतत रुग्णालये व कोविड केअर सेंटरला भेट दिली. तेथील परिस्थितीचा आढावा घेत करोनाच्या रुग्णांबाबत माहिती घेत उपाययोजना केल्या.

शहरात कोविड रुग्णांसाठी पाच हजारहुन अधिक सीसीसी बेड तयार केले. त्याचप्रमाणे कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयात 92, ऑटो क्‍लस्टर 50, जिजामाता रुग्णालय 12, भोसरी रुग्णालय 10 असे 160 पेक्षा अधिक आय.सी.यु. बेड उपलब्ध करून दिले.

याशिवाय शहरातील डी.वाय. पाटील हॉस्पिटल, बिर्ला हॉस्पिटल यासारखी अनेक खासगी हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आली. रुग्णालयाच्या समस्या काय आहेत, रुग्णांची व्यवस्था कशी आहे, ऑक्‍सिजन मध्ये येणारा तुटवडा, त्यावरील नियंत्रण याबाबत माईंनी सातत्याने प्रशासनाला सूचना दिल्या. माईंच्या याच पाठपुराव्याने शहरातील करोनाचा दर कमी झाला.

सर्वात जास्त रिकव्हरी रेट पिंपरी चिंचवड महापालिकेचा असल्याचे माई अभिमानाने सांगतात. करोनाकाळात माईंनी आपल्या वयाचाही विचार न करता शहरामध्ये झंझावाती दौरे केले. यामुळे पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची एक नवीन ऊर्जा तर आलीच, पण माईंचा आदरयुक्त दबदबाही निर्माण झाला.

माईंच्या याच शिस्तप्रिय स्वभावामुळे शहराची करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. माईंचे एवढे वय असतानाही त्यांनी करोनाच्या धोक्‍याबाबत कधी विचार केला नाही. माझ्या शहरातील जनता सुखरुप राहिली पाहिजे, याच भावनेने माई खऱ्या अर्थाने शहराच्या माई बनून संकटाला सामोरे गेल्या.

लॉकडाऊनच्या काळात माईंनी मायेच्या पंगती उठविल्या

शहरामध्ये लॉकडाउन झाल्यानंतर कामगारांची अवस्था वाईट झाली. हातावर पोट असलेल्या गरीबांना एकवेळच्या जेवणाची भ्रांत झाली. या काळात माई त्यांच्यासाठी देवदूत बनून आल्या. माईंनी शहरातील नागरिकांसाठी जेवण तयार करण्यासाठी मोठ-मोठी चुलांगणे उभी केली. रोजगारासाठी आलेल्या कामगारांसाठी तसेच झोपडपट्टीतील नागरिकांसाठी माईंनी जेवण पुरविण्यास सुरूवात केली. शहरातील नागरिकांना जेवण पुरविण्यासाठी माईंनी दिवसरात्र काम केले.

शहराच्या अनेक भागात अन्न-धान्याच्या किट पुरविल्या. लॉकडाऊनच्या काळातच अनेक बेवारस रस्त्यावर पडून राहत असल्याचे चित्र माईंना दिसले. त्या बेवारस नागरिकांची सोय झाली पाहिजे यासाठी त्यांनी ‘सावली निवारा केंद्र’ उभारले. आज त्या केंद्रामध्ये शेकडो बेवारस आनंदाने राहत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.