नवीदिल्ली – भारताचा फलंदाज मयंक अग्रवालच्या डोक्याला बॉल लागल्याने त्याला रविवारी रुग्णालयात नेण्यात आले. राजकोटमध्ये सुरू असलेल्या इराणी ट्रॉफी 200 विरुद्ध सौराष्ट्र सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. इराणी चषक हा रणजी करंडक विजेते आणि शेष भारत यांच्यात खेळला जातो, हा एकतर्फी सामना भारत आणि 2019-20 रणजी करंडक विजेते सौराष्ट्र यांच्यात राजकोट येथे सुरु होता.
समोर आलेल्या माहितीनुसार सौराष्ट्रचा दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी मयंकच्या डोक्यात बॉल लागल्याने त्याला वैद्यकीय स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. 31 वर्षीय मयंकने शनिवारी 14 चेंडूत 11 धावा केल्या. वैद्यकीय उपचारादरम्यान मयंकला कोणतीही गंभीर दुखापत न झाल्याचे समोर आले त्यासोबतच त्याची प्रकृती देखील व्यवस्थित असल्याचे समजते.
शेष भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे उर्वरित वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, उमरान मलिक आणि कुलदीप सेन यांनी सौराष्ट्रची फलंदाजी अवघ्या 98 धावांत गुंडाळली. पहिल्या डावात मुकेशने 4, तर उमरान मलिक आणि कुलदीपने प्रत्येकी तीन बळी घेतले.