मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे 12 मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
राज्यातील शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. तसेच, राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. याचाच प्रभाव अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अ
आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपने आपल्याकडे घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिंदे गटाने इथे उमेदवार देत पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपने आपल्याकडे घेतल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अंधेरी पूर्व येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले. भाजप आणि शिंदे गट युतीचे उमेदवार श्री. मुरजीभाई पटेल यांना स्थानिकांचा भरघोस पाठिंबा असल्याचे यावेळी दिसले. pic.twitter.com/KdQ5IZpw9l
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 2, 2022
अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात आशिष शेलार यांनीही एक ट्वीट केले होते. ते म्हणाले आहेत की, “अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं अंधेरी पूर्व येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले. भाजप आणि शिंदे गट युतीचे उमेदवार मुरजीभाई पटेल यांना स्थानिकांचा भरघोस पाठिंबा असल्याचे यावेळी दिसले.” यामध्ये ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी मुरजी पटेल यांचा उल्लेख भाजप आणि शिंदे गट युतीचे उमेदवार असा केला आहे.