INDvBAN 1st Test : नाणेफेक जिंकून बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय

इंदूर – भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास सुरुवात होत आहे. टी-20 मालिका गमावलेल्या पाहुण्यांची भारतीय गोलंदाजीसमोर सरस कामगिरी करण्याचे आव्हान आहे.
बांगलादेशला टी 20 मालिकेत पराभव पत्करावा लागला होता, त्यांच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्यानंतर उर्वरित दोन्ही सामन्यांत अत्यंत बेजबाबदार फलंदाजी केली होती. पहिला सामना भारताने गमावला होता. पण त्यानंतर पुढील दोन्ही सामने भारताने जिंकले. आजपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली संघात परतला आहे.

दरम्यान भारत-बांगलादेश दरम्यानच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट लढतीस इंदूर येथील होळकर स्टेडियमवर सुरूवात झाली अाहे. बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हक याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

सध्या बांगलादेशचे तीन फलंदाज तबूंत परतले अाहे. यामध्ये शदमन इस्लाम ६, इमरूल केस ६ आणि मोहम्मद मिथुन १३ धावांवर बाद झाला आहे. भारतीय गोलंदाजीत इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला आहे. सध्या बांगलादेशच्या २४ षटकांत ३ बाद ५३ धावा झाल्या असून खेळपट्टीवर मुश्फिकुर ४ तर मोमिनुल २२ धावांवर खेळत आहे.

भारतीय संघ –
मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा

बांगलादेश संघ –
इमरुल केस, शदमन इस्लाम, मोहम्मद मिथुन, मोमिनुल हक, मुशफ़िकुर रहीम, महमूदुल्लाह, लिटन दास, मेहदी हसन, तैजुल ईस्लाम, अबु जाएद, एबादत होसैन.

Leave A Reply

Your email address will not be published.