नवी दिल्ली : इराणमधील एका प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला आहे. हे विमान इराणहून चीनच्या दिशेने जात आहे. मात्र भारतीय हवाई हद्दीत आल्यानंतर या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. भारताने या विमानाला सुरक्षेच्या कारणांमुळे दिल्लीत उतरण्यास परवानगी नाकारली आहे. दरम्यान, बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर भारतीय हवाई दल सतर्क झाले असून सुरक्षा यंत्रणांकडून या विमानावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, इराणमधील एका प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला जात आहे. हे विमान इराणहून चीनकडे जात होते. मात्र भारतीय हवाई हद्दीत आल्यानंतर या विमानात बॉम्ब असल्याचा माहिती वैमानिक तसेच इराण विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेला मिळाली आहे.
‘Bomb threat’ onboard Iranian passenger jet over Indian airspace, with final destination in China, triggers alert, IAF jets scrambled. The passenger jet is now moving towards China. Security agencies monitoring the plane: Sources pic.twitter.com/5Up2fHURxW
— ANI (@ANI) October 3, 2022
या माहितीनंतर वैमानिकाने या विमानाला दिल्ली विमानतळावर उतरण्यास परवानगी मागितली होती. मात्र दिल्ली विमानतळ प्रशासनाने ही परवानगी नाकारली आहे. त्यानंतर हे विमान आता चीनच्या दिशेने रवाना झाले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा या विमानावर लक्ष ठेवून आहेत.
हे विमान इराणमधील तेहरान येथून चीनमधील गुआंगझोऊ येथे जात होते. मात्र विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर महान एअरने विमान दिल्लीत उतरवण्यासाठी परवानगी मागितली. दिल्लीने विमानतळ प्रशासनाने ही परवानगी नाकारत विमान जयपूरच्या विमानतळावर उतरवण्याची सूचना केली. मात्र वैमानिकाने विमान जयपूरला उतरवण्याचा नकार देत भारताची हवाई हद्द सोडली आहे. सध्या हे विमान चीनच्या दिशेने जात आहे.