आळंदी -माऊलींच्या चलपादुकांचा आणखी चार दिवस आजोळ घरीच मुक्काम आहे. नित्यनेमाने चलपादुकांची पूजा अर्चा केली जात आहे.
तर शुक्रवारी (दि. 16) सायंकळी सहाच्या सुमारास शेडगे पंच मंडळी पुणे यांचे वतीने विशेष भारुडाचा कार्यक्रम होणार असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
माऊलींच्या चलपादुका दशमी दिवशी सोमवारी (दि. 19) राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीतून सकाळी दहा वाजता माऊली माऊलीचलूरर जयघोषात पंढरीकडे प्रस्थन होणार आहे.
माऊलींचा आजोळ घरी मुक्कामास गुरुवारी (दि. 14) 14 दिवस पूर्ण झाले असून येथे नित्यनेमाने पवमान अभिषेक, काकडा, पूजाअर्चा, महानैवेद्य, भजन, कीर्तन, जागर असे नित्याचे धार्मिक कार्यक्रम पादुकांसमोर सुरू आहेत