दौंड – करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दौंड तालुक्यातील उपजिल्हा व यवत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील तसेच जे कर्मचारी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता देश सेवेसाठी झटत आहेत.
त्यांचे मनोबल वाढावे या हेतूने त्यांना आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर, मास्कचे वाटप आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढील काळात देखील अधिक गरज पडल्यास त्या अधिकारी व कर्मचारी यांना उपलब्ध करून देणार असल्याचेही आमदार कुल यांनी यावेळी सांगितले.