बिबवेवाडी – येथील पोलीस स्टेशन हद्दीतील संतोष बामणे यांची कन्या रेवती (रा. पोकळे वस्ती बिबवेवाडी, पुणे) आणि नामदेव खेमनर यांचे चिरंजीव सौरभ (रा. औरंगाबाद) हे दोघेही मूकबधिर असून आज त्यांचा विवाह सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे बिबेवाडी पोलीस ठाणे यांनी या सोहळ्यात महत्वाची भूमिका पार पाडली. बिबेवाडी पोलीस ठाणे यांच्या सहकार्याने महेश सोसायटी येथील दत्त मंदिरामध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. सदर वेळी मुलीचे बिबवेवाडी पोलीस ठाणे तर्फे कन्यादान करण्यात आले. सदर विवाह सोहळा हा सोशल डिस्टन्सचा नियम पाळून पार प़डला. यामध्ये मुलीकडील 5 व मुलाकडील 5 पाहुणे तसेच पोलिस ठाणेकडील 5 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अशी माहिती बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर यांनी दिली आहे.