Market Record High । भारतीय शेअर बाजाराने आज एक नवा इतिहास रचलाय. सेन्सेक्स-निफ्टीने सर्वकालीन उच्च विक्रमी पातळी गाठली आहे. BSE सेन्सेक्सने प्रथमच 73,000 चा टप्पा ओलांडला. NSE निफ्टीने प्रथमच 22,300 चा उच्चांक गाठला आहे. बँक निफ्टीने इंट्रा-डे 47,000 पार केलाय.
निफ्टी आणि सेन्सेक्सची नवीन विक्रमी पातळी Market Record High ।
NSE निफ्टीने 22,312.65 ची नवीन विक्रमी उच्च पातळी गाठली आहे आणि पहिल्यांदाच निफ्टी 22,300 च्या वर गेला आहे. आज निफ्टीने 22,048.30 च्या पातळीवर सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्सनेही नवीन शिखर गाठले आहे आणि 73,590.58 या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचलाय. तो आज 72,606 वर सुरू झाला आणि सेन्सेक्सने इंट्राडे 1000 हून अधिक अंकांची उडी दर्शविलीय.
सेन्सेक्स आणि निफ्टीची सध्याची पातळी
दुपारी 1 वाजता, BSE सेन्सेक्स 1068.38 अंकांच्या किंवा 1.47 टक्क्यांच्या वाढीसह 73,568 वर व्यवहार करत आहे आणि NSE निफ्टी 318.00 अंकांच्या किंवा 1.45 टक्क्यांच्या वाढीसह 22,300.80 वर आहे.
BSE वर शेअर्स वाढले
बीएसईवर 3858 शेअर्सचे व्यवहार होत आहेत, त्यापैकी 2494 शेअर्सची वाढ आणि 1235 शेअर्स घसरत आहेत. 130 शेअर्समध्ये कोणताही बदल होताना दिसत नाही. BSE वर, 302 शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेडिंग करत आहेत आणि 223 शेअर्स लोअर सर्किटवर ट्रेडिंग करत आहेत.
टाटा स्टील बनला king Market Record High ।
बीएसई आणि एनएसई या दोन्ही निर्देशांकांवर टाटा स्टीलचा सर्वाधिक फायदा झाला. BSE सेन्सेक्स 5.36 टक्क्यांच्या वाढीसह आणि NSE निफ्टी 5.50 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
बीएसईवर चौफेर हिरवाईमुळे बाजारात उत्साह आहे
BSE सेन्सेक्सच्या 30 पैकी 26 समभागांमध्ये वाढ आणि चार समभागांमध्ये घट दिसून आली. सेन्सेक्समधील २६ समभागांपैकी टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स आणि टायटन यांच्या समभागांमध्ये वाढ दिसून येत आहे. JSW स्टीलचे मार्केट कॅप 2 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. बँक निफ्टीने आज पुन्हा 47 हजारांचा टप्पा ओलांडला असला तरी त्याची 48,636.45 ही आतापर्यंतची उच्च विक्रमी पातळी ओलांडण्याची अपेक्षा आहे.