Shinde Faction Mlas Clash। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी अगोदरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर आता राज्यातील नेत्यांमध्येच राडा होत असल्याचे दिसून येतंय. आज विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार आपापसांतच भिडल्याचे पाहायाला मिळाले. विधिमंडळाच्या लाॅबीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार एकमेकांना भिडले.
नाशिक जिल्ह्यातून येणारे मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाली. रस्त्याच्या कामावर विचारपूस करण्यात अली होती त्यावरून हा वाद सुरु झाल्याचे सांगण्यात येतंय. दरम्यान या प्रकारानंतर विधिमंडळात एकच गोंधळ झाला. त्यानंतर या दोन्ही आमदारांना शांत करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली.
शंभूराज देसाई म्हणाले, धक्काबुक्कीचा पुरावा काय? Shinde Faction Mlas Clash।
दरम्यान, हा वाद झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांकडून वाद झालाच नाहीत, असा दावा करण्यात आला. मध्यस्थीनंतर धावलेल्या शंभूराज देसाई यांनी हा वाद झाल्याचा पुरावा काय? असा दावा केला. ते म्हणाले की, बोलताना कोणाचा आवाज वाढला म्हणजे वाद झाला असं नाही. योगायोगाने मी तिथे होतो. मला ते जेव्हा समजलं उंच आवाजामध्ये सुरू आहे म्हणून दोघांनाही घेऊन गेलो. लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदार महोदय आणि त्यांचा विषय मला सांगितला आणि आमदार साहेबांचं काम कसे मार्गी लावता येईल हे पाहिलं. एकमेकांच्या अंगावर जाणं असं बिलकुल काही घडलेलं नाही.
ते पुढे म्हणाले की, माध्यमांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे. माध्यम प्रतिनिधी काही आतमध्ये येतात. त्यांनी सुद्धा खात्री केल्याशिवाय अशी बातमी चालवणं योग्य नाही. जर आमदारांना विचारला असता, संबंधित मंत्री महोदयांना विचारलं असतं तर ते मी सांगितलं. मी सभागृहामध्ये होतो. माझं सभागृहामध्ये कामकाज आहे, पण जेव्हा मला हे समजलं तेव्हा सभागृहातील कामकाजातून बाहेर येऊन आपल्याला ही वस्तुस्थिती सांगत आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया टाळली Shinde Faction Mlas Clash।
दरम्यान, वाद झाल्याचे कानावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिडचिड झाल्याचे दिसून आले. त्यांनी अरे काय तर काय विचारताय? अधिवेशनातील कामाचे विचारा, अशी प्रतिक्रिया देत वादावर भाष्य केलं नाही. दुसरीकडे, शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा प्रांगणाला आखाडा केल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी सडकून टीका केली आहे.