Market Opening । देशांतर्गत शेअर बाजाराची आजची सुरुवात सपाट झाली. मात्र काही वेळाने सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात उघडण्यात यशस्वी झाले. बाजार सपाट सुरू झाला असला तरी बाजार उघडल्यानंतर लगेचच तेजी दिसून आली. कालप्रमाणेच आजही एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण आहे. त्यासोबतच मीडिया, मेटल, फार्मा या क्षेत्रांमध्येही घसरण पाहायला मिळतीय.
सेन्सेक्स समभागांची स्थिती काय आहे? Market Opening ।
सेन्सेक्समधील 30 पैकी 19 समभागांमध्ये वाढ तर 11 समभागांमध्ये घसरण होतीय. सर्वाधिक वाढणाऱ्या सेन्सेक्स समभागांपैकी मारुती सुझुकी 2.57 टक्के आणि इंडसइंड बँक 1.54 टक्क्यांनी वर आहे. बजाज फायनान्स 1.20 टक्क्यांनी तर पॉवर ग्रिड 1.14 टक्क्यांनी वर आहे. भारती एअरटेल 0.83 टक्क्यांच्या वाढीसह आणि नेस्ले 0.79 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
निफ्टीचे चित्र कसे आहे?
निफ्टीच्या 50 समभागांपैकी 26 समभाग वधारत आहेत तर 22 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. 2 शेअर्समध्ये कोणताही बदल न होता ट्रेडिंग होताना दिसत आहे. निफ्टीच्या 2268 शेअर्सची खरेदी-विक्री होत असून त्यापैकी 1256 शेअर्स वाढीसह आणि 899 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. 113 शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय व्यवहार करत आहेत.
निफ्टी टॉप गेनर्स/ टॉप लूजर्स Market Opening ।
निफ्टी 50 समभागांमध्ये आयशर मोटर्स 4.61 टक्के आणि मारुती सुझुकी 2.53 टक्क्यांनी वधारले आहेत. BPCL 2.38 टक्क्यांनी तर IndusInd Bank 1.90 टक्क्यांनी वर आहे. बजाज ऑटो 1.53 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. घसरलेल्या निफ्टी समभागांमध्ये हिंदाल्को 1.67 टक्क्यांनी आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज 1.37 टक्क्यांनी खाली आहे. UPL 1.31 टक्क्यांनी आणि ग्रासिम 1.23 टक्क्यांनी घसरत आहे. DV’s Labs 1.04 टक्क्यांच्या कमजोरीसह व्यापार करत आहे.
BSE चे मार्केट कॅपिटलायझेशन
जर आपण BSE चे बाजार भांडवल बघितले तर ते 374.04 लाख कोटी रुपये झाले आहे आणि कालच्या तुलनेत त्यात वाढ दिसून येत आहे. कालच्या व्यवहाराच्या शेवटी, बीएसईचे बाजार भांडवल 373.96 लाख कोटी रुपये होते.