पुणे -पावसामुळे सध्या फुले भिजली असून, सुक्या फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या सुक्या फुलांच्या भावात वाढ झाली आहे. निर्बंधामुळे मंदिरे बंद आहेत.
गेल्या काही दिवसांपासून फुलांना मागणी नव्हती. गणेशोत्सवामुळे फुलांना मागणी वाढली असून फुलांचे भाव तेजीत आहेत. फुलांना चांगले दर मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवात हारांसाठी कोलाकता प्रजातीच्या झेंडुला मागणी वाढते. हा झेंडू आकाराने लहान असतो. एक किलो सुक्या झेंडूला 70 ते 100 रुपये असा भाव मिळत आहे. ओल्या झेंडूला 20 ते 40 रुपये असा भाव मिळाला आहे.
शेवंतीला 50 ते 70 रुपये किलो असा भाव मिळाला असून, ओल्या शेवंतीचे दर कमी आहेत. गुलछडीचे भाव तेजीत असून प्रतवारीनुसार 230 ते 400 रुपये किलोने गुलछडीची विक्री केली जात आहे.