सातारा – जीवदया कमिटीच्या महाराष्ट्र विभागाच्या वतीने सुरू असलेल्या सेवा कार्यांतर्गत स्व. शा. फुलचंद प्रतापजी जैन यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त वेळे येथील करुणामंदिर गोशाळेतील गोमातांसाठी अन्न म्हणून ७०० किलो टरबूज आणि कलिंगड प्रदान करण्यात आली.
शा फुलचंद प्रतापजी जैन परिवाराच्या वतीने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती जवानमल जैन यांनी जीवदया कमिटीच्या वतीने दिली. तसेच तेथील यशोधन आश्रमात त्यांनी बुंदीचे लाडू व द्राक्षांचे वाटपही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.