‘मराठी बाणा सांगणारी सेना, सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली’- आशिष शेलार

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी वीनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. त्यामुळे आता राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे भाजपकडून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे.

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून, शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. शेलार म्हणले कि, ‘नाही धार “सच्चाई”कारांच्या शब्दांना आज दिसली, “रोखठोक”लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे..छे..झुकली रे झुकली…मराठी बाणा सांगणारी सेना…सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!’ असं त्यांनी म्हंटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.