#INDvWI : पहिल्या वनडेसाठी ‘असा’ आहे भारताचा ११ जणांचा संघ

चेन्नई : टी-२० मालिका आटोपल्यानंतर आजपासून भारत-वेस्टइंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिकेस सुरूवात होत आहे. वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून भारतास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल असून भारतीय संघाने फलंदाजीस सुरूवात केली आहे.

भारतीय संघाने आजच्या सामन्यात युवा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याला एकदिवसीय कारकिर्दीत पर्दापण करण्याची संधी दिली आहे. लोकेश राहुलला सलामीसाठी तर चौथ्या क्रमांकासाठी श्रेय्यस अय्यरला संधी दिली आहे. यष्टीरक्षक म्हणून पंतवर विश्वास दाखविला आहे.वेगवान गोलंदाज दीपक चहरचा संघात समावेश केला आहे.

दरम्यान, नुकतीच झालेली टी-२० मालिका भारताने २-१ ने जिंकली. आता एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतही तोच फाॅर्म कायम राखण्याचा प्रयत्न विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा असेल.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

वेस्टइंडिज संघ : विंडीज: केरोन पोलार्ड (कर्णधार), शाई होप (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेज, जेसन होल्डर, कीमो पॉल, हेडन वॉल्श अल्जारी, जोसेफ, शेल्डर कॉट्रेल.

Leave A Reply

Your email address will not be published.