सोनई, (वार्ताहर) – सुजाता स्कूमध्ये विविध उपक्रमांसह मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या ज्योती सोनवणे, शिक्षिका वंदना बारहाते उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषेची माहिती सांगितली.
विविध मराठी गीतांवर नृत्य सादर केले. मराठी कविता, गीत गायन केले. संस्थापक किरण सोनवणे यांनी मराठी दिनाच्या शुभेच्छा देत मराठी भाषेची थोरवी स्पष्ट केली. पसायदान सेवाभावी संस्था, सोनई आयोजित निबंध स्पर्धेत शाळेतून सार्थक ढगे याने प्रथम क्रमांक, भोगे शिवानी द्वितीय क्रमांक तर पालवे ऋषिकेश याने तृतीय क्रमांक मिळवला.
या निबंध स्पर्धेत एकूण 9 शाळा सहभागी झाल्या. त्यात सुजाता स्कूलचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी सार्थकढगे याला प्रथम क्रमांक मिळाला. शाळेतील शिक्षिका सुजाता दरंदले, स्वाती गडाख व सविता जाधव आदींनी मराठी दिनाचे महत्व सांगितले . सूत्रसंचालन सुवर्णा तोडमल यांनी तर आभार सचिन चांडे यांनी मानले.