शेवगाव, (प्रतिनिधी) – ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था आयोजित ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, श्रीरामपूर येथे नुकतेच पार पडले.
यावेळी मराठी भाषेच्या निरंतर सेवा, प्रचार, प्रसार व संशोधन कार्यातील योगदानाबद्दल शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने येथील नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठीचे शिक्षक बापूसाहेब लोढे यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्य गौरव पुरस्कार ‘ देऊन सन्मानित करण्यात आले.
मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, समीक्षक डॉ.बाबुराव उपाध्ये, प्रा. डॉ .वसंतराव शेंडगे, माजी प्राचार्य चंद्रकांत कर्डक यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक सुरेश शेरे, देवराम सरोदे, शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, राजेंद्र पानगव्हाणे, मोहन उंडे, संतोष देशमुख, अप्पासाहेब खंडागळे, प्रकाश मरकड आदी उपस्थित होते.