रोहित पवारांनी ‘अशी’ पूर्ण केली दिवंगत तहसीलदाराची इच्छा

नागपूर – कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी नागपूर विभागात कार्यरत असलेल्या कर्जत-जामखेड येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये मूळचे कर्जत-जामखेड परिसरातील मात्र सध्या नौकरीनिमित्ताने नागपूर विभागात कार्यरत असणारे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमाबाबतची माहिती रोहित पवार यांनी दिली असून यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी हृदयविकाराने निधन झालेल्या तहसीलदार सुभाष यादव यांच्याबाबतची एक आठवण सांगितली.

पवार यांनी आपल्या फेसबुकवर याबाबत एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे. मूळचे कर्जत जामखेड येथील रहिवाशी असणारे सुभाष जाधव हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीला येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. यादव यांनी रोहित पवार यांच्याकडे नागपूर अधिवेशनावेळी भेटण्याची इच्छा बोलून दाखवली होती मात्र काही दिवसांपूर्वीच यादव यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने त्यांची इच्छा अपूर्णच राहिली होती.

दिवंगत तहसीलदार यादव यांच्या नागपूर भेटीची इच्छा अपूर्णच राहिली मात्र कर्जत-जामखेड परिसरातील नागपूर विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला अशी भावनिक पोस्ट रोहित पवारांनी लिहिली आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here