चिंचवड : समाजात मंदबुद्धीचे लोक सैराचार वाढवितात. युवकांनी अशा लोकांपासून दूर रहावे, सैन्य दलात युवापिढीला अनेक संधी उपलब्ध असून, येथे मात्र स्वयंशिस्तीला फार महत्त्व असते.
युवकांनी शिक्षक व पालकांकडून शिस्त अंगीकारावी, अभ्यासाबरोबर इतर साहित्यांचे नियमित वाचन करा, त्यामुळे स्वतःविषयी आत्त्मविश्वास वाढतो. भविष्यात जे करायचे आहे. त्याची ध्येयनिश्चिती ठरवून आपली स्वप्नपूर्ती करावी, असे प्रतिपादन निवृत्त कमांडर योगेश चौधरी यांनी केले. ते प्रतिभा महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी बोलत होते.
चौधरी पुढे म्हणाले, समाजात मंदबुद्धीचे लोक सैराचार वाढवितात. युवकांनी अशा लोकांपासून दूर रहावे, सैन्य दलात युवापिढीला अनेक संधी उपलब्ध असून, येथे मात्र स्वयंशिस्तीला फार महत्त्व असते. युवकांनी शिक्षक व पालकांकडून शिस्त अंगीकारावी, अभ्यासाबरोबर इतर साहित्यांचे नियमित वाचन करा, त्यामुळे स्वतःविषयी आत्त्मविश्वास वाढतो. भविष्यात जे करायचे आहे. त्याची ध्येयनिश्चिती ठरवून आपली स्वप्नपूर्ती करावी असे ते म्हणाले.
महाविद्यालयाचे सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, येणार्या 2030 साली आपला भारत देश जगात युवकांचा देश होणार आहे, युवकांनी देखील संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैर उपयोग करू नये, देशाच्या व समाजाच्याप्रती संवेदना, भाईचारा, प्रेम सदैव जागृत ठेवून स्वतःबरोबर देशालाही समृद्ध करण्यासाठी आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहन त्यानी केले.
प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ पथसंचलन करून उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच, कला, क्रीडा, काव्य आदी क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते भरतभाई शहा, संस्थेचे विश्वस्थ डॉ. सुशील मुथीयान, संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, अध्यक्षा प्रतिभा शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस, एम.बी.ए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्हाडे, डॉ. जयश्री मुळे, प्राध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महिमा सिंग, प्रा. पल्लवी चुग यांनी तर, आभार प्रा. निजी साजन यांनी मानले.