Entertainment : मराठी मालिकेतील अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीला चित्रीकरणादरम्यान स्टंट करताना दुखापत झाल्याची घटना घडली आहे. कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘काव्यांजली’ मध्ये काव्या ही व्यक्तिरेखा कश्मिरा कुलकर्णी साकारत आहे. मात्र एका सीनमध्ये स्टंट करताना तिच्या पायाला जोरात लागते. या सीनचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर करत दुखापत झाल्याची माहिती दिली आहे.
एका सीनमध्ये कश्मिरा चालत असताना मागून टेम्पो येत असतो. तेवढ्यात तिला क्रेनच्या साहाय्याने वर उचलले जाते आणि टेम्पोवर ठेवले जाते. मात्र टेम्पोवर येत असतानाच तिच्या पायाला जोरात लागतं. याची झलक तिने व्हिडिओ पोस्ट करत दाखवली आहे. विशेष म्हणजे पायाला दुखापत झाल्यानंतर देखील तिने शूट पूर्ण केला.
View this post on Instagram
कश्मिराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, ती अॅक्शन सीनसाठी ती पूर्णपणे तयार झाली असून तिला सेफ्टी बेल्ट लावण्यात आले होते. ती चालत असताना मागून ट्रक येतो आणि तिला सेफ्टी बेल्टने वर उचललं जातं. सीन व्यवस्थित शूट होत असताना मात्र ट्रकच्या वरच्या भागाला काश्मिराचे दोन्ही पाय खूप जोरात आपटतात. यामुळे तिच्या पायाला दुखापत पायाला लेप लावण्यात आलाय आणि त्यावर सफेद बॅंडेडने पाय कव्हर केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दुखापत झाल्यानंतर पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले ,’कितीही अडचणी आल्या तरी परफेक्ट सीन पूर्ण होईपर्यंत मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पडद्यामागे प्रत्येक जण मेहनत करत असतो….’ काव्याने या व्हिडिओतून शूटिंगदरम्यान नेमकं काय घडले हे दाखवले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या दोन्ही पायांना दुखापत झाली असून पायांना पट्ट्या लावल्याचे दिसत आहे. यानंतर चाहत्यांनी तिच्या तब्येतीची चिंता व्यक्त करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.