सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. तिच्या आयुष्यात ज्या व्यक्तीची चर्चा होत आहे ती दुसरी कोणी नसून तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघेही एकत्र दिसत आहे. हे दोघे चित्रपट निर्माता विशाल गुरनानी यांच्या दिवाळी पार्टीत एकत्र आले. यावेळी सुष्मिता रोहमनचा हात धरताना दिसली. एवढेच नाही तर पापाराझींना पोज देतानाही सुष्मिता आणि रोहमनमध्ये केमेस्ट्री दिसली.
View this post on Instagram
सुष्मिता आणि रोहमन अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण 2021 मध्ये दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबत ब्रेकअप झाल्याची घोषणा केली होती. यानंतरही ते अनेक प्रसंगी एकत्र दिसले, आता ज्या प्रकारे दोघेही हात हातात धरून दिसले, त्यावरून त्यांच्यात पॅचअप झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुष्मिता – रोहमनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत आणि एकमेकांचा हात पकडून पापाराझींना सुंदर पोज देत आहे. सुष्मिताने काळ्या जाळ्याची साडी नेसली असून तिच्यासोबत सिम्पल दागिने घातले आहे. तर त्याने पांढऱ्या कुर्ता पायजमासोबत हिरव्या रंगाचा ब्लेझर घातलेला दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ‘सुष्मिताला रोहमन हात देत चालतांना मदत करत आहे. यानंतर दोघे एकत्र पोज देत आहेत आणि यादरम्यान सुष्मिताने रोहमनला पकडून ठेवले आहे. दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.’ काही महिन्यांपूर्वी सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून रोहमन सुष्मितासोबत असल्याचे सांगितले जात आहे. तो त्याच्यासोबत सर्वत्र दिसतो.