Maratha Reservation – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलच तापलं आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले असून, आज सातव्या दिवशी देखील हे उपोषण सुरु आहे.
अनेक ठिकाणी हिंसक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. अनेक गावांनी खासदार, आमदारांसह नेत्यांना गावात प्रवेश बंदी असलेले जाहीर फलक लावले आहेत. त्यामुळे गावोगावी सरकार व विविध राजकीय नेत्यांच्या विरोधात रोष तयार होऊ लागला आहे.
दरम्यान, अश्यातच मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणात मराठी कलाकारांनी देखील भूमिका मांडली आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashvini Mahangade) एक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओत ती मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनात सहभागी झाल्याचेही दिसत आहे.
View this post on Instagram
तसेच, अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर ट्वीट शेअर करत हेमंत ढोमेने आपलं मत मांडलं आहे. “आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय…मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय…
आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय..
मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय…
त्यांच्या नाय्य मागणीचा विचार झाला पाहिजे!सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत!
शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये!
जय शिवराय! pic.twitter.com/uTa1OlZ9Sy— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) October 31, 2023
त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे.! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!” असं ट्वीट त्याने केलं आहे.
हेमंत ढोमेप्रमाणे मनोरंजनसृष्टीतील कलाकार किरण माने, रितेश देशमुख यांनी सुद्धा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या उपोषणासंदर्भात भाष्य केलं आहे. सध्या सोशल मीडियावर या कलारांची पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.