मराठा आरक्षण : सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली

नवी दिल्ली – मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. परंतु, न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी आज कुठलाही निर्णय घेण्यास नकार दिला आहे.

नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आजची सुनावणी पार पडली. यावेळी चार आठवड्यांसाठी मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा पाच न्यायामूर्तींच्या खंडपीठाकडे जावा, त्याचे लिस्टींग व्हावे यासाठी सरकारला वेळ मिळाला आहे.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी मान्य केले. आरक्षण मुद्द्याची तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठांऐवजी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी व्हावी, अशी मागणी सरकारकडून करण्यात आली होती.

मराठा आरक्षणाप्रकरणी सकाळी ११ वाजता सुनावणी सुरू झाली. पण सरकारी वकील मुकुल रोहतगी हे यावेळी अनुपस्थित असल्याने काही काळासाठी न्यायालयाने ही सुनावणी स्थगित केली. दरम्यान, सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.