प्रियाच्या एथनिक लूक बघितला का ?

मुंबई – मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फैशन ‘क्विन’ च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रिया बापटने अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.


अभिनेत्री प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.सध्या तिच्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते.

नुकताच प्रियाने एथनिक लूकमधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रिया या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. तिचा हा फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडले. प्रियाचा हा लूक तिच्या फॅन्सनादेखील आवडला आहे.

दरम्यान, काकस्पर्श, हॅपी जर्नी, आम्ही दोघी, वजनदार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात प्रियाने लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. हिंदी, मराठी चित्रपटांसोबतच मालिका आणि नाटकांमध्ये देखील तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान प्राप्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.