मराठा क्रांती ठोक मोर्चाची आज मंत्रालयावर धडक

ठाणे: मराठा क्रांती ठोक मोर्चाने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारने तोडगा न काढल्यामुळे सोमवार, दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा धडक मोर्चा काढणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी दिली.

हा मोर्चा सीएसएमटीवरून मंत्रालयापर्यंत काढणार येणार आहे. दोन दिवसांत सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. आंदोलन काळातील सर्व गुन्हे मागे घ्या, 2014च्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्‍त्या देण्यात यावी, मेगा भरतीतील विद्यार्थ्यांना तातडीने सामावून घ्यावे, सारथी प्रशिक्षण संस्था मराठ्यांसाठी समिती द्यावी, शेतकऱ्यांना पीकविमा तत्काळ खात्यामध्ये जमा करावी असा विविध मागण्या संघटनेकडून करण्यात आलेल्या आहेत. यासाठी अनेकवेळा आंदोनलही छेडण्यात आले होते. पण सरकारकडून फक्‍त आश्‍वासनेच मिळत आहेत, असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाने केला. हा मोर्चा अडवल्यास ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×