मल्याळम सिनेमातील सुपरस्टार आणि ऍक्शन हिरो सुनील शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेला “मरक्कर’- द लायन ऑफ अरेबियन’ 17 डिसेंबरला अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. मल्याळममध्ये हा ऍक्शन ड्रामा सिनेमा थिएटरला 2 डिसेंबरला रिलीज होऊन गेला आहे.
पण पॅन अंडियाच्या प्रेक्षकांसाठी ही कथा पुन्हा अनुभवण्यासाठी हिंदीत आणली जाणार आहे. मरक्करचे डायरेक्शन प्रियदर्शनने केले आहे. प्रियदर्शननेच याचे लेखनदेखील केले आहे.
मोहनलाल आणि सुनील शेट्टी या दोघांव्यतिरिक्त दक्षिणेतील अनेक गाजलेले कलाकार असणार आहेत. भारतातील महान नौदल अधिकारी कुंजली मरक्कर यांचा हा बायोपिक असणार आहे. मलबार किनाऱ्याजवळ कर्तव्य बजावत असताना पोर्तुगालच्या हल्लेखोरांबरोबर झालेल्या युद्धावर हा सिनेमा आधारलेला आहे.
या युद्धानंतर मरक्कर कालिकतचे राजा जमोरीन यांचे नौदल प्रमुख बनले होते. मल्याळम सिनेमामध्ये हा आतापर्यंतचा सर्वांत महागडा सिनेमा ठरला आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट, सर्वोत्कृष्ट वेशभुषा आणि सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाला होता. आता या सिनेमाचा आनंद प्रेक्षकांना अमेझॉन प्राईमवर घेता येणार आहे.