चाईबासा :- झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात बीएसएफच्या एका माजी जवानाची संशयित माओवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून गोळ्या झाडून हत्या केली.सुखलाल पूर्ती असे ठार झालेल्या माजी जवानाचे नाव आहे.
मृतदेहाशेजारी सीपीआय (माओवादी)ची पत्रके सापडली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.माओवाद्यांच्या एका गटाने गुरुवारी रात्री पूर्तीच्या घरात घुसून पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून कदमडिहा पंचायत अंतर्गत काशीजोडा गावात त्याची हत्या केली.
पूर्ती यांनी बीएसएफमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती आणि ते सामान्य जीवन जगत होते.घटनास्थळी काही पत्रके सापडल्याने ही घटना डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांनी केली असावी असा कयास आहे.
या घटनेतील हल्लेखोरांची प्राथमिक माहिती मिळाली असून त्यानुसार त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्री हा माजी जवान खरोखरच पोलिसांचा खबरी होता किंवा कसे याची पुष्टी मात्र होऊ शकलेली नाही.