नागपूर – निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याचे प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खासगी स्वरुपाच्या होते. निवडणुकीवर परिणाम होईल असे हे गुन्हे नव्हते. तसेच त्यांनी कुठल्या हेतूने हे गुन्हे लपवले हे सिद्ध होत नसल्याने त्यांना दोषमुक्त करण्यात येत आहे, असा निकाल प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. जाधव यांनी दिला.
या सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीस हे ऑनलाइन पद्धतीने हजर झाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रात आपल्यावरील दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप ऍड. सतीश उके यांनी केला होता. या याचिकेत उके यांनी फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती.