मुंबई – मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील कारणाम्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळेच मानसीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतात. प्रेमविवाह करणाऱ्या मानसीने अवघ्या दोन वर्षांतच पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेतला. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ते एकमेकांवर सातत्याने टीका करत होते. आता मानसी त्यातून बाहेर पडत आहे. काही दिवसांपूर्वीच मानसीने घरही खरेदी केल.
अशातच मानसीने शेअर केलेल्या नवीन व्हिडीओचं कॅप्शन चांगलंच चर्चेत आहे. “हा कमबॅक वैयक्तिक आहे. ही मी स्वत:चीच मागितलेली माफी आहे, मी हार मानणार नाही,” असं म्हणत मानसीने या व्हिडीओमध्ये ‘शराफत छोड दी मैने’ या लता मंगेशकर यांच्या गाण्यावर अभिनय व डान्स करताना दिसत आहे.
दरम्यान, मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ रोजी झालं होतं. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच मानसी नवऱ्यापासून घटस्फोट घेतला. अशात आता मानसीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने नात्याबाबत थेटपणे भाष्य केल्याचे पाहायला मिळते.