मुंबई : ठाण्यातील मीरा रोड येथील गीता नगर परिसरातील हत्या कांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे, या हत्याकांडातील आरोपी मनोज सानेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मनोजने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केली आणि नंतर मृतदेहाचे छोटे तुकडे करून ते कुत्र्यांना खाऊ घातले. पोलिसांना परिसरातील लोकांनी कळवताच स्थानिक पोलिसांनी तपास सुरु केला आणि मनोजला अटक केली. अशात आरोपी मनोजला गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले तेथून त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस चौकशीदरम्यान मनोज सानेने पोलिसांना सांगितले,’तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे आणि त्याचे सरस्वतीसोबत कधीही शारीरिक संबंध नव्हते. तो पुढे म्हणाला की सरस्वतीशी संबंध नसण्याचे आणखी एक कारण म्हणजे ती त्यांच्या मुलीसारखी होती.
पोलिसांना चौकशीत मनोजने पुढे सांगितले,’लिव्ह-इन पार्टनर सरस्वती हिने ३ जून रोजी आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्या केल्यानंतर आता याप्रकरणी पोलीस आपल्यावर गुन्हा दाखल करतील, अशी भीती त्याला सतत वाटत होती. या कारणास्तव त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आत्महत्येची योजना आखली होती आणि घडलेल्या प्रकाराचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
या घटनेबाबत पोलिसांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले, गुन्हेगार मनोजने सरस्वती मृतदेहाचे छोटे तुकडे करून ते कुत्र्यांना खाऊ घातले. मृतदेहाचे तुकडे त्याने इलेक्ट्रिक ट्री कटर केले होते.