Manoj Jarange Patil on Ajay Baraskar । मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकरयांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली. अजय महाराज बारसकर यांनी मोठे खुलासे करत जरांगेंवर टीकास्त्र डागले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा कुटुंबांना उध्वस्त केले आहे, अशी घणाघाती टीका अजय महाराज बारसकर यांनी केली. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना अजय महाराज बारसकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात किती अन् कुठं गुप्त बैठका झाल्या या संदर्भातील संपूर्ण माहिती उघड केली आहे. ते म्हणाले, “23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहीं जणांसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजनगाव गणपती इथं उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मिटिंग केली आहे. । Manoj Jarange Patil on Ajay Baraskar
लोणावळा, वाशीमध्ये ही समाजाला वगळून मिटिंग केली. वाशी आंदोलन इथवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो. मात्र त्यांचा मिटिंगमुळे मला आक्षेप होता.’ तर पहिली गुप्त मिटींग बीडला कन्हैया हॉटेलमध्ये झाली. त्याची माहिती उपलब्ध आहे. दुसरी गुप्त मिटींग रांजणगावला पहाटे 4 वाजता झाली.
तिसरी गुप्त मिटींग पुण्यातील औंध परिसरात झाली. त्यानंतर लोणावळ्याला झाली. पाचवी मिटींग वाशी येथे समाजाला वगळून केली. वाशी पर्यंत मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या बैठकांवर आक्षेप होता. । Manoj Jarange Patil on Ajay Baraskar
मनोज जरांगे यांना काहीही कळत नाही पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय?’ असा खोचक टोला बारसकर यांनी यावेळी लगावला.