Manoj Jarange On Chhagan Bhujbal – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर हल्ला चढवला आहे. जरांगे हे मारुतीचे शेपूट आहे. ते शांत बसणार नाहीत.
त्यांनी आता वयोवृद्ध नागरिकांनाही उपोषणाला बसण्याचे आवाहन केले आहे. यात वृद्धांच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर थेट जरांगेंना जबाबदार धरले जावे, असे आवाहन भुजबळ यांनी पोलिसांना केले आहे. ( Manoj Jarange On Chhagan Bhujbal )
जरांगे यांना काही कळत नाही. आता त्यांनी विनाकारण गाव बंद करण्याचा इशारा दिला आहे. कहर म्हणजे ते वयस्कर लोकांनाही उपोषणाला बसवत आहेत. या नागरिकांच्या जिवाला काही झाले तर काय करायचे? सरकार सर्वच गोष्टींवर सकारात्मक विचार करत आहे.
पण ते उगीचच गैरसमज निर्माण करत आहेत. ते प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काहीही बरळत आहेत. त्यांनी १० तारखेच्या उपोषणासाठी समाजातील लोकांनाही विश्वासात घेतले नव्हते. श्रेय घेण्यासाठी ते स्वतःच उपोषणा जाऊन बसले, असेही ते म्हणाले. ( Manoj Jarange On Chhagan Bhujbal )