शिक्रापूर -येथील सामाजिक व शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात अग्रेसर असलेले आदर्श शिक्षक मनोहर शामराव परदेशी यांची अखिल महाराष्ट्र कुमावत समाजाच्या राज्य प्रवक्तेपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
शिक्रापूर येथील मनोहर शामराव परदेशी यांची नाशिक येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. याप्रसंगी राज्याध्यक्ष साहेबराव कुमावत, राज्य सचिव देविदास परदेशी, राज्याचे वरीष्ठ उपाध्यक्ष रवींद्र बैताडे, राज्य युवाध्यक्ष स्वप्नील नाईक, पुणे अध्यक्ष संजय परदेशी, औरंगाबादचे माजी महापौर गजानन बारवाळ आदी उपस्थित होते.
समाजातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. बांधकाम कामगारांना सरकारकडून विमाकवच तसेच साहित्य खरेदीसाठी अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे परदेशी यांनी यावेळी सांगितले.