#Mann Ki Baat: कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी सहा वाजता ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात देशाला संबोधित करतील. यापूर्वी ‘मन की बात’ कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता असायचा.

पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे वेळापत्रक बदलले जाण्याची ही पहिली वेळ आहे.

यापूर्वी 29 डिसेंबर रोजी ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारित झाला होता. यामध्ये पंतप्रधानांनी जनतेला गरिबांच्या उन्नतीसाठी काम करण्याची आणि देशी वस्तू खरेदी करण्याची विनंती केली. इस्त्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ नावाचा उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या योजनेचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला होता.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.