नवी दिल्ली, दि. 12 – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 87 वर्षीय मनमोहन सिंग यांना रविवारी रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी साडेबाराच्या सुमाराला त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांची रुग्णालयात करोना चाचणी पण करण्यात आली आहे. त्यात त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
रविवारी त्यांना एका नवीन औषधाची रिऍक्शन आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते लगेच त्यांना तेथे अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते; पण दुसऱ्याच दिवशी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आयसीयुतून बाहेर हलवण्यात आले.
आज त्यांना पूर्ण बरे वाटू लागल्याने घरी जाऊ देण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत.