टेबल टेनिस स्पर्धेत मनीष रावत उपांत्य फेरीत

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या डॉ. प्रमोद मुळे स्मृती करंडक प्रौढ राज्य मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत सुहास कुलकर्णी, प्रकाश केळकर, नितिन तोषनीवाल, मनीष रावत व सुष्मा मोगरे या खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठली.

उपांत्यपूर्व फेरीत 65 वर्षांवरील पुरुष गटात मुंबई उपनगरच्या सुहास कुलकर्णीने दरियाल परेराचा 11/6, 11/2, 11/8 असा तर उल्हास शिर्केने 7/11 , 6/11, 11/9, 11/6, 11/4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 60 वर्षांवरील पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई उपनगरच्या प्रकाश केळकरने पुण्याच्या तानाजी खिलारेचा 11/8, 11/6, 11/5 असा तर पुण्याच्या रोहिदास गरुडने पुण्याच्याच हरीष साळवीचा 11/8, 11/6, 11/1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

50 वर्षांवरील पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत सोलापुरच्या नितीन तोषनीवालने मुंबई उपनगरच्या प्रमोद देसाईचा 11/8, 11/5, 11/5 असा तर पुण्याच्या अजय कोठावलेने मुंबई उपनगरच्या राजेश सिंगचा 11/13, 5/11, 11/9, 11/6, 11/9 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 40 वर्षांवरील पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत सोलापूरच्या मनीष रावतने नाशिकच्या मकार जोगचा 11/1, 12/10, 11/5 असा तर पुण्याच्या दिपेश अभ्यंकरने पुण्याच्याच शेखर काळेचा 11/7, 11/8, 11/4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

40 वर्षांवरील महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत ठाण्याच्या सुषमा मोगरेने पुण्याच्या आशालता कुलकर्णीचा 11/5, 11/6, 11/7 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. पुण्याच्या सारिका वरदेने मुंबई उपनगरच्या नीतू देवधरचा 11/3, 11/1, 11/6 असा तर मुंबई उपनगरच्या श्रावणी धाप्रेने पुण्याच्या मुग्धा जोशीचा 11/4,11/7,11/4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

Leave A Reply

Your email address will not be published.