सलमानच्या “दबंग 3’ची त्याचे फॅन अगदी उत्सुकतेने वाट बघत आहेत. “दबंग 3’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. मात्र ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सिनेमातील गाणी रिलीज झाली आहेत. त्याचे कारण म्हणजे या सिनेमात सलमानने गायलेले एक गाणे रिलीजसाठी तयार व्हायचे होते.
ते आता तयार झाले आहे आणि सलमानच्या आवाजातले गाणेही रिलीज झाले आहे. “यूं करके’ असे या गाण्याचे बोल आहेत. सलमानने म्हटलेले गाणे हीच या गाण्याची खासियत आहे. गाण्याचे बोल थोडेसे विचित्रच आहेत.
थोडक्यात ते अगदी सलमानच्या ईस्टाईलला शोभेल असेच आहे. सलमानच्या बरोबर पायल देवने हे गाणे गायले आहे. अजित-वाजिदने या गाण्याला संगीत दिले आहे.
सलमानच्या “दबंग’ फ्रॅंचाएजीमध्ये कॉलरचे एक टोक तोंडात धरून नाचण्याची स्टाईल खूप लोकप्रिय झाली होती. त्याच स्टाईलच्या स्टेप्स या गाण्यातही बघायला मिळतील, अशी आशा आहे.
या गाण्याचे शुटिंग मध्यप्रदेशातल्या मंडलेश्वर इथे झाले असल्याचे समजते आहे. सलमानला संगीतातले फार काही समजते असे नाही. मात्र त्याच्या आवाजातले गाणे फॅन्सला नक्की आकर्षित करेल, यात शंका नाही.