दत्तजयंती निमित्त माणिकबाग दत्त मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे: माणिकबाग दत्त मंडळाने सालाबाद प्रमाणे यंदाही दत्तजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे यॊजन केले होते. यावर्षी माणिकबाग दत्त मंडळाने चौदाव्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त यंदा’ये शाम मस्तानी’ या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सामाजिक वारसा जपत मंडळाकडून स्नेहवन संस्थेतील आत्महत्याग्रस्त शेतकयांच्या मुलांना अन्नधान्याचे वाटपही करण्यात आले. तसेच हिंगणे येथील मतिमंद मुलांना महाप्रसादाचे वाटप केले.

या दत्तजयंतीच्या कार्यक्रमात परिसरातील महिलांसह अबालवृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. गणेश खेंगरे, संजय नवलाख, संदिप साळवी, गजानन चव्हाण, विकास सोंगाडे, राहुल पेंडसे, सुधीर आचार्य, दीपक पेंडसे, दिनकर चौधरी, सत्येन्द्र दळवी, अमित त्रिंबके, रवी तनपुरे या कार्यकर्त्यांनी दोन दिवस विशेष सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.