नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अलिबागचे समुद्रकिनारे सज्ज

मुंबई – डिसेंबर महिना संपण्यासाठी अवघे वीस दिवस उरले असताना प्रत्येक जण नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनके पर्यटक अलिबाग जिल्ह्यात उतरल्याचे दिसून येत आहे. अलिबाग एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्दीस आल्यापासून अलिबाग बीचवर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल केले आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागताला रायगडला पर्यटक पसंती देत असल्याने 10 जानेवारी पर्यंत हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेसची बुकिंग आधीच पर्यटकांनी केलेली आहे. त्याचबरोबर नारळी फोफळी च्या वाड्यांमधील कुट्याही हाऊसफुल्ल झाले आहेत. अलिबाग समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ठ म्हणजे सपाट आणि लांब असा हा समुद्र किनारा आहे. समुद्र किनाऱ्यासह रायगड किल्ला, कुलाबा किल्ला, माथेरान आणि जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळे ही गर्दिनी फुलली आहेत.

दरम्यान, पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात दाखल झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी कंबर कसली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.