मंगळुर : कोरोना विषाणूंची बाधा वाढत असल्याचे लक्षात आल्यावर मंगळूरू बंदर आणि विमानतळावर अतीसतर्कतेचा आदेश देण्यात आला. केरळला लागून असणाऱ्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात विशेष देखरेख ठेवण्यात येत आहे. याशिवाय उडुपी, कोडगू, चामराज आणि म्हैसुरू येथे सतर्कता बाळगण्यात येत आहे.
मंगळुरूतील सरकारी रुग्णालयात विलगता कक्ष उभारण्यात आला आहे. 12 देशातील प्रवाशांची कठोर तपासणी करण्यात येत आहेत. हैदराबादमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला कोरोनाची बाधा झाली आहे. तो हैदराबादला जाण्यापुर्वी बंगळुरूमध्ये त्याच्या कंपनीच्या कार्यालयात गेला होता. त्यामुळे कर्नाटक सरकारची झोप उडाली आहे.