मेलबर्न – आयसीसी महिला विश्वचषक टी-20 स्पर्धेतील उपांत्य फेरीचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ब गटातील सामना मंगळवारी पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ब गटात अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरी गाठली आहे. आता उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेसमोर ऑस्ट्रेलियाचे तर भारतीय महिला संघासमोर इंग्लंडचे आव्हान असेल.
The #T20WorldCup semi-final draw:
3pm local time: ?? v ???????
7pm local time: ?? v ??Who are you backing to make it to the final? pic.twitter.com/ar3vcAI7Re
— T20 World Cup (@T20WorldCup) March 3, 2020
स्पर्धेतील दोन्ही उपांत्य फेरीचे सामने हे गुरूवारी (5 मार्च) होणार आहेत. भारत विरूध्द इंग्लंड यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यास गुरूवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. तर, दुसरा उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.
Group A semi-finalists confirmed ?
Here’s how the table looks at the end of the group stage. #T20WorldCup pic.twitter.com/7YEb29iR5t
— T20 World Cup (@T20WorldCup) March 2, 2020
दरम्यान, आयसीसी महिला विश्वचषक टी-20 स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यांत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला अवघ्या चार धावांनी पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत सर्वप्रथम भारत पोहोचला असून संघाने साखळीतील सर्व सामने जिंकत सर्वाधिक 8 गुणांची कमाई केली. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाने सहा गुणांसह उपांत्य फेरी गाठली आहे. तर, आफ्रिकेनं ब गटात सात गुणांसह तर इंग्लंडने सहा गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.