राज ठाकरे भेटणार ममता बॅनर्जींना

इव्हीएम मशिन्सना विरोध करण्यासाठी “राज’कारण

मुंबई – राज ठाकरे येत्या आठवड्यात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार असून ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे आणि ममता बॅनर्जींमध्ये बैठक होणार असून याच विषयावर चर्चा करण्यासाठी राज यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर आगामी काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असे निवेदन त्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिले होते. तब्बल 14 वर्षांनी ते दिल्लीला गेले होते. या भेटीत त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या दिशेने मनसेने टाकलेले पहिल पाऊल म्हणूनच त्यांच्या या भेटीकडे पाहिले गेले होते. आता ईव्हीएमचा मुद्दा घेऊनच ते ममता बॅनर्जी यांना भेटायला जाणार आहेत. मोदी सरकारविरोधातील ममता बॅनर्जी यांचा राग आणि ईव्हीएमला त्यांचा असलेला विरोध हा सर्वज्ञातच आहे. त्यामुळे त्यांच्या भेटी बद्दल आता चर्चा सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.