चंद्रकांत मोहोळ ः मुठा येथे विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात ः मामासाहेब मोहोळ आणि बाबुराव घोलप जयंती उत्साहात
पिरंगुट – मुळशी तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचे काम मामासाहेब मोहोळ यांनी केले आहे. देशभर कुस्तीचा ठसा उमटविताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली, तसेच गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची कवाडे उघडी केली, असे प्रतिपादन मामासाहेब मोहोळ कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व राष्ट्रीय कुस्ती पंच चंद्रकांत मोहोळ यांनी केले.
मुठा (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ विद्यालयात शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार मामासाहेब मोहोळ व संस्थापक बाबुराव घोलप यांची संयुक्त जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी चंद्रकांत मोहोळ बोलत होते. यानिमित्त गावातून मामासाहेब मोहोळ व बाबुरावजी घोलप यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढली.
यावेळी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, पदके देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भरेकर, सरपंच चारुशीला तिकोणे, उपरपंच विजय मोहोळ, सदस्य ज्ञानेश्वर मोहोळ, गरुड सर, सुनिल मोहोळ, तानाजी मोहोळ, दत्ता मोहोळ, अनिल मोहोळ अकुंश तिकोणे, गणेश मोहोळ, आकाश भरेकर ज्ञानेश्वर अष्टेकर, श्रीकांत मोहोळ, मुख्याध्यापक संदीप हिंगाणे, शिवाजी सर्जराव आदी ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.
स्पर्धाचा निकाल पुढीलप्रमाणे
कुस्ती स्पर्धा – मुले (प्रथम क्रमांक) – 28 किलो – मोहन पाचारणे, 30 किलो – धीरज मोहोळ, 35 किलो – जयंत अमराळे, 40 किलो – शंतनू उभे, 45 किलो – आदित्य मोहोळ, 50 किलो – सौरभ मोहोळ. मुली – 28 किलो – सिद्धी मोहोळ, 30 किलो – तमन्ना खान, 40 किलो – स्नेहल तारू, 45 किलो – अंकिता पोळेकर, 50 किलो – सिद्धी अमराळे, 54 किलो – सुवर्णा बरदाडे. रांगोळी स्पर्धा – अकांक्षा गुजर (प्रथम), साक्षी दळवी – (द्वितीय), तृतीजा रायरीकर (तृतीय). धावणे स्पर्धा – आर्यन भरेकर, खुशी चोपडे. वक्तृत्व स्पर्धा – संकेत वरपे (प्रथम), अदित्य मोहोळ (द्बितीय), दिव्या मोहोळ (तृतीय). भालाफेक – मुले – आर्यन मोरे, मुली – मृणाल ठोरले. गोळाफेक – साहम डोरेले, दीक्षा गायकवाड. चित्रकला स्पर्धा – लहान गट – सचित्रा मोहोळ, मोठा गट – अदिव्या मोहोळ. निबंध स्पर्धा – लहान गट – आर्यन मोहोळ, मोठा गट – दिव्या मोहोळ. कॅरम स्पर्धा – अधर्व रायरीकर, अस्मिता मोहोळ.